header ads

Tuesday, 22 October 2013

देवसुद्धा अगदी धुक्या सारखा असतो......

कधी कधी आपल्या आठवणींच्या खजिन्यात काही अशा मोलाच्या आठवणी असतात कि त्याचं मोल आपण ठरवूनच शकत नसतो. अगदी या सुरेख आठवणी आपला दिवस सत्कर्मी लावतात. मग त्यांना तुम्ही कसा जपता यावर ते आधारित असत. काही आठवणी आपल्याला अशा असतात कि त्यात जगणं आपल्या खूपच मोहक आणि स्वर्गीय वाटतं.
    पृथ्वी आपल्या असा भोवती फिरते हा जगातील महान शोध आहे. काही आठवणी एवड्या सुंदर आणि महाग असतात कि त्यांची किमंत आपल्याला आयुष्यातील वेळ देऊन मोजावी लागते. या सुंदर आठवणी आपल्या जिवंत तर ठेवतात पण जगू देत नाही. कित्तेक वेळा आपण विचार करतो कि या पासून आपण आपली सुटका करून घ्यावी आपण ते करतो देखील परंतु त्याच गोष्टी आपल्या भोवती फिरतात आणि आपण त्याचा आस असतो यावरून पृथ्वीपरिभ्रमण आपल्या लक्ष्यात येते.
   देवसुद्धा अगदी धुक्या सारखा असतो, समोरच काही दाखवत हि नाही आणि उजाडल्या शिवाय राहत हि नाही.        

No comments:

Post a Comment

Contributors