हा ब्लॉग माझे आवडते लेखक, संगीतकार, वक्ते, अभिनेता पुलंना समर्पित. त्यांच्या 'व्यक्ती आणि वल्ली' या पुस्तकांपासून प्रेरित आहे.
![]() |
| Sketch by- प्रभाकर वाईकर |
माझ्या आदर्श व्यक्तीमत्वांपैकी एक 'पु. ल. देशपांडे'. आणि आता तर ते माझे फेसबुक वर मित्र आहेत. इ.स. पूर्व जन्मानंतर सन १९९६ च्या महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमा द्वारे ईयत्ता ७ ला आमची दोघांची ओळख 'बटाट्याची चाळ' या पुस्कातील धड्याद्वारे झाली. त्या दिवसात मी काही अभ्यासू किंवा अवांतर वाचन करणारा विद्यार्थी नव्हतो. (खरं तर ते आता ही नाही.) त्या दिवसात सारे लेखक आपल्या वाईटवरच उठ्ल्यात असं मला वाटायचे. संतांवर तर माझा विशेष राग होता. तर असं आहे की, पुलंचा 'उपास' हा धडा आम्ही जेंव्हा शिकलो. शालेय जीवनातील पहिला लेखक ज्यांनी मला 'धडा' शिकवला नाही तर हसवला. मग त्यांच्या या हसवा-हसवीच्या मी जणू प्रेमातचं पडलो इतर धडे मग मला पुस्तकातील 'खोगीरभरती' वाटे. कायम स्मरणात राहणार तो दिवस होता. केवळ हाच लेखक आपल्या बाजूने असा विश्वास ठाम झाला.
![]() |
| माई कुठलाच दागिना घालत नसे, पण त्यांच्या आईने त्यांच्याकरिता एक मंगळसूत्र केलं होतं. त्या नोंदणी पद्धतीच्या लग्नात, सुनीता ठाकूर आता कुंकू लावून आणि मंगळसूत्र घालून सुनीता देशपांडे झाल्या . |
पुलांचे अंधश्रद्धे विषयीचे विचार वाचले कि, माझ्यासारख्या पामराकडे शब्दच उरात नाही




No comments:
Post a Comment