header ads

Tuesday, 12 July 2016

'कोहिनूर भारताचा'

  
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची ही १२५ वा रौप्य जयंती महोत्त्सव. या दिवसाचे औचित्य साधून अनेक जणांनी आपल्या परीने या महोत्त्सवचा आनंद लुटला  त्याला कारण ही तसेच होते. ठिक-ठिकाणी पार्ट्या झाल्या नाविन्य साधण्याच्या नादात जे मनाला आवडेल ते; आणि जसे बरे वाटेल तसे केले. यात काहीच गैर नाही. करण हजारो वर्षाच्या विटाळातून त्या महामानवाने जगण्याचा हक्क दिला, भविष्य दिलं, अस्तित्व, ओळख, मूलभूत हक्क आणि लढण्याचा वारसा दिला.  

                


                                  "उपाशी जगाचा पसा होता
                                  असा भीम होता, असा भीम होता"
                                              - महाकवी वामनदादा कर्डक 

अनेक माध्यमांनी या विषयी चित्रपट, गाणी, विद्रोही गाण्याचे कार्यक्रम ठेवले होते. अनेकांनी या महोत्त्सवात आपला सहभाग दर्शवला. दरवर्षी प्रमाणे पाली भाषेने सलग १२ ते १७ तास अभ्यास करून त्यांना अदांजली अर्पित केली. अनेक 'पोस्टर बॉयस' त्यांच्या नावाचे भले मोठे होर्डिंग लावले. त्यांच्या प्रतिमेच्या किंवा कार्याचा, विचारांचा अदर कमी आणि यांचीच नामावली अधिक होती. आकाशवाणीने  अनेक घरगुती (म्हणजेच इन-हाऊस, ज्याची खबर कोणालाच नव्हती) कार्यक्रमाचं आयोजन केलं. यु.एन या सवंस्थेने तर अटकेपार हा महोत्सव साजरा केला. महान व्यक्तींच्या कामाचा आढावा त्यांचा आदर्श आपण घेऊन आपला विकास साधने हीच त्यांना वाहिलेली आदरांजली आहे. परंतु या मध्ये साऱ्यांनी इतर करतायेत म्हणून आपण करूया किंवा मग एक बुल्लेटीन किंवा फारतर RJ मेंशन मध्ये आटोपलं. त्यांच्या समोर "Time is money" हेच सूत्र समोर ठेवून ससेहोळट केली. पण ज्यांनी रुपीस चे सूत्र मांडळ त्याच तत्वाला बगल दिली. असो कोणी काय ? कसे केले ? या पेक्षा ज्यांनी केले त्यांच्या पाठीवर थाप द्यायलाच हवी. 'ABP माझा'  ने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर, विचारांवर 'प्रकाश' टाकण्याचा अनोखा प्रयत्न केलं त्यांच्या सर्वव्यापी आंबेडकर या
मालिके द्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची या मालिके द्वारे नव्याने ओळख होते एवढं मात्र खरं...
  

No comments:

Post a Comment

Contributors