header ads

Monday, 17 October 2016

चहा - पाणी !?

              "चाय से ज्यादा तो किटली गरम है , ''चला चाय पाणी घेऊ," "साहेब थोडं चाय पाण्याचं बघा !
आशा  अनेक म्हणी आपल्याला त्या त्या किटली, टपरी नुसार ऐकायला मिळतात. भारतात चहाचा प्रारंभ हा ईस्ट इंडिया कंपनीने केला. सुरवातीला मोफत चहा विकला आणि सवय लागल्यावर त्याचा कर १५० वर्ष घेतला. भारतीय हे पारतंत्र्य सुद्धा त्यांनीच विकलेल्या चहाचा अस्वाद घेत घेत बोलले असावेत.काही सतत गैरहजर विद्यार्थ्यांचं मत असेही कि, भारतीयांनी मेजवानी म्हणून 'बोस्टन टी-पार्टी'केली. अगदी त्या दिवसापासून ते आज पर्यंत लोक चहासोबत काहीतरी घेतात मग काहीजण  बिस्कीट, सिगरेट, टोस, खारी तर कधी पॉलिटिक्स पण चहासोबतच. भर में महिन्याच्या कडक उन्हात देखील लोक चहा घेतात. ही भारतीयांची खोड अनेक भारतीय व अभारतीय व्यापाऱ्याने नेमकी जाणली. भारतीय लोक आपल्या चहाच्या कार्यक्रमाला इतर लोकांप्रमाणेच ते अगदी 'वाघ भाकरी'ची  हात मिळवणी घडवून आणू शकतात इतका त्यांचा दांडगा  विश्वास आहे. चहा पिता - पिता कोणाचे लग्न जमण्यापासून ते 'पार पडे'पर्यंतचे योजना केवळ या पेयाला साक्षी धरून केल्या जातात. भारतीयांची हिच श्रद्धा पाहून वेगवेगळ्या योजना, जाहिराती, लघुपट, येवढचं काय सरकार पण तयार झालीत. २०१५ -१६ च्या निवडणुकांमध्ये "चाय पे चर्चा, कम खर्च्या " करूनच मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी  निवडून आले.
चहाचं  महत्व व्यक्तिपरत्वे वेगवेगळं असते. कोणाला गोड, काळी, पांढरी, हिरवी आशा अनेक प्रकारच्या चहा आवडतात. कोणत्या व्यवसायातील लोक अधिक चहा पितात? हे सांगणं कठीण आहे, परंतु प्रत्येक व्यवसायातील लोक चहा मात्र नक्की पितात. सरकारी इतमात तर लोक तास - तास चहापितात. सरकारी कार्यालयात संध्याकाळी - सकाळी जवळ जवळ १ तास लोक चहा पितात. माध्यमात (मिडिया) मध्ये कामकरणाऱ्या मंडळींचा चहा सिगरेट हाच मुख्य आहार असताना दिसतो. प्रत्येकाची चहा पिण्याची खोड, सवय, पद्धती वेगळी. जे लोक मनापासून चहावर प्रेम करतात ते छान शेगडी, चुलीवर मस्त 'कड' आलेली चहा घेतात. तर काहींना फक्त चहाचा पिण्याचा 'कड'  येतो म्हणून ते मशीनच्या चहावर भागवतात. माझं आणि कॉफीचं कधी जमलंच नाही. तिचा तो कृष्णधवल रंग किंवा तिची श्रीमंती चव कधी माझ्या जिभेला भावलीच नाही. त्यामुळे मी शेवटची कॉफी केंव्हा प्यायलो हे मला आठवतच नाही. तांबुस, खदूळ  पाण्याचा रंग घेतलेली तिच्या सुगंधाने आसमंत बहरून उठवा, असा चहा मला नेहमीच आवडतो. अगदी मध्यरात्री उठूनही  मी चहा पिऊन झोपु शकतो इतकं माझं प्रेम आहे 'तिच्यावर'.
 चहाच्या प्रत्येक घोटासोबत अनेक गुपितं, ध्येयाच्या नव्या कक्षा सहज अवाख्यात आल्यासारख्या वाटतात. अनेक लोक, अनेक मिटिंग आणि ... बरच काही. असाच किस्सा जो मला चहापेक्षा गोड वाटला विक्रोळीच्या कान्नमवार पोलीस स्टेशन समोर राजस्थानी चहावाला आहे. दुधाचे दात पडल्यापासून या चहावाल्याने चहा प्यायला सुरवात केली असावी आणि त्याच गडबडीत तो दात घासायला विसरला असावा. अनेक पोलीस अधिकारी या टपरी वर येउन चहा पितात. काही विकत तर काही..... विकतचं !
एकेसकाळी चहापीत असताना 'N. N राठोड' नावाचे अधिकारी त्या टपरीवर आले. त्यांनी आपल्या पोलीसी खाक्यात त्या चहावाल्या पोराला सांगितले
" सून ... एक चाय लेके जा ऑफिस में मॅडम को और ... एक चाय और लेके जा और जो कस्टेडी मैं  बैठा है उसको भी दे !
चायवाला : क्यू साब मारवाडी है क्या वो ?
      "नही भारतीय है, और वो इन्सान हैं" गलती तो हार किसीसे होती है
मला तर ते चार भुजा असणारे तथाकथित देवचं भासू लागले.
राठोड साहबांनी माणुसकीचा एक नवा घाटच घालून दिला. असाच विचार प्रत्येकानी केला तर ....!

No comments:

Post a Comment

Contributors