माझी आत्महत्या
( हा ब्लॉग किंवा ही कथा काल्पनिक आहे. यात काही साधर्म्य आढळ्यास स्वतःला भाग्यवान समजावे )
( हा ब्लॉग किंवा ही कथा काल्पनिक आहे. यात काही साधर्म्य आढळ्यास स्वतःला भाग्यवान समजावे )
तो दिवस तसा काही फार वेगळा नव्हता.
भांड्यांच्या कळकटानच मला जाग आली होती. खरं तर ही जाग पूर्णार्थाने आली होती.
सवई प्रमाणे मी काही गोष्टी केल्या.
पुरुषी अहम दुखावला की, तो कोणताही निर्णय घ्यायला तुम्हाला तो सहज तयार करतो. इथं तर त्याच्यावर बलात्कार झाला होता.
पुरुषी अहम दुखावला की, तो कोणताही निर्णय घ्यायला तुम्हाला तो सहज तयार करतो. इथं तर त्याच्यावर बलात्कार झाला होता.
कसं मरावं ? काय खावं याचा विचार मी चवीसोबतच त्याची मला ऍसिडिटी होणार नाही ना ! इतपत मी करीत होतो. ट्रेन, गळफास, सर्प द्वंश इत्यादींचा मी विचार करीत होतो. हे सारे पर्याय मला जीवघेणे वाटले शेवटी मी झोपेच्या गोळ्या घेण्याचा विचार केला. पण मरण इतकंही स्वस्त नसतं हे मला तेंव्हा कळालं. खुप रिसर्च करून एका ओळखीतल्या म्हाताऱ्या आजींच्या औषधाची चिट्टी मी पळवली. मोठ्या हिकमतीने झोपेच्या गोळ्या जमवल्या आपली प्रतिकार शक्ती राकट आहे म्हणून मी ६ गोळ्या एकत्र केल्या.
आता प्रश्न होता आत्महत्याच्या चिट्टीचा ? कोण - कोण आपल्या मरणावर रडेल ही कल्पना मला फार आनंद देत होती. मग आत्महत्याच्या चिट्टीच्या मजकुराचा मी विचार केला. २ तर चक्क मीच हसून लोटपोट झालो इतकी विनोदी मी लिहिल्या होत्या. हे काम मी थोडं बाजूला ठेवलं. आपल्या या ग्रहावरच्या शेवटच्या दिवशी आपण ते सर्व करायचं असं ठरवलं. मी उगीचंच फिरलो अनेकांची माफी मागितली, लोकांना मदत केली, आवडत्या लोकांना वेळ काढून भेटलो, भरपूर खाल्लं, ते ते सर्व केलं जे जे करण्यासाठी मी कधी घाबरलो, लाजलो होतो.
आम्ही दोघे २ ते ३ वर्ष एकत्र होतो. प्रत्येक क्षण माझ्या मेंदूवर टाक्याने कोरले होते. ती खूप सुंदर, हुशार, आणि साऱ्यांपेक्षा वेगळी होती. तिच्या वागणुकीचे पदर होते. इतर मुलींप्रमाणे ती नव्हतीच. तिच्या याच वेगळे पणाचा मी घायाळ ठरलो. मी माझं प्रेम तिच्या समोर व्यक्त केलं, तिने एक आठवड्याने सांगितले 'नाही' पण आम्ही एकत्र होतो. बघता - बघता एकमेकांच्या सहवासाची गोडी वाटू लागली. भेटी इतक्या वाढल्या की त्याच्या गाठी पडल्या. बघता बघता दिवस भुर्रर्रर्र झाले. मला संधी मिळाली की माझं प्रेम तिच्यावरचा माझा असणारा जीव मी तिला तन्मयतेते सांगे. समोर असली तर हसायची आणि msg वर कायम गप्प. तेंव्हा कळलं ती ते लाजून नाही तर माझ्यावर हसायची. खरं तर हे सारं माझ्यासाठी बोचरं असायचं पण... ती वेगळी ना ... ! कधी कधी वाटे चालताना तिने माझा हळूच आपला हात घ्यावा, एकत्र जेंव्हा असू तेंव्हा जगाच्या तापाला बाजूला करून निवांत विश्रांती माझ्या खांद्यावर घ्यावी असं मला नेहमी वाटे. कधी डोळ्यात गेलेल्या खळ हळुवार फुंकर मारून सुखावण्याचा प्रयत्न करावा असं नेहमी वाटे पण तिने तसं कधी केलं नाही; शेवटी ती वेगळी होती ... म्हणून मग मीच हे सारं काही करत असे. शेवटी तिच्या वेगळेपणाची खाज आणि कौतुक मलाच होतं. कधी तरी तुम्ही जे करत असता त्याचा ही बांध फुटतो. त्याच्याकरता जीव जळावा त्यालाच त्याची फिकीर नसेल तर काय उपयोग ? एके दिवशी मी वेगळं ठरायचं ठरवून विचारलं
"माझ्या I Love You चा तू कधी reply का देत नाही ? "
आणि कैक दिवसांपासुनचा हा प्रश्न तिने मार्गी लावायचं ठरवलं. ती म्हणाली
" तू माझ्यावर प्रेम करतोस its ok! मी कधी तुला म्हणाले का मी ही तुझ्यावर प्रेम करते, आफ्टर ऑल हा तुझा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. "
" तू माझ्यावर प्रेम करतोस its ok! मी कधी तुला म्हणाले का मी ही तुझ्यावर प्रेम करते, आफ्टर ऑल हा तुझा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. "
माझ्या चांगलाच लक्षात आलं, एका क्षणात ते सारं काही ओझल झालं.. आयुष्य सोबत घालवण्याच्या माझ्या इच्यांना तिने मूठ माती दिली होती.
" तुला आणखी बोलायचं नसेल, तर आपण निघूया "
ती ते सारं इतक्या सहज बोलतं होती कि, तिच्या त्या वेगळेपणाचा आता मला राग, किव येत होती.
"plz मला घरी जाऊन जेवण करायचं आहे "
बघता बघता आम्ही 'वाटेला' लागलो
मला माझं उत्तर तर मिळालं होतं पण ते सहन करण्याची ताकद मी हरवून बसलो होतो. तिच्या चेहऱ्यावर अजिबात भाव नव्हते. त्या रात्री भीमराव पांचाळ, सुधीर भट, जगजीत सिंग, या साऱ्यांना मी झोपू दिलं नाही. पंकज उदास तर भलतेच उदास झाले होते.
आता हा ग्रह सोडायचा हा विचार मी पक्का केला. बऱ्यापैकी मी एक तारीख निवडली कारण अशी संधी फार कमी जणांना मिळते. ठरल्या दिवशी मी घरीच थांबलो. फिरलो, भटकलो संध्याकाळी चहाची वेळ झाली. आईने चहा पुढ्यात देत अनेक बालपणीचे किस्से सांगायला सुरुवात केली. मी लहान असताना पावसाळी दिवस होते. मी आजारी झालो होतो. आईने मला डॉक्टरकडे घेऊन गेली होती. त्यांच्या इथे आम्हाला वेळ लागला आणि आमची S.T. सुटली. आई मला घेऊन उन्हाच्या कडाक्यातून १६ किमी चालत घरी आली. माझ्या आजारपणात तिने ऊन वाऱ्याची फिकीरच केली नव्हती. आईने वडिलांनी केलेल्या त्या सर्व त्यागाचा आई खूप मनमोकळ्या स्वभावाने हसत सांगत होती. त्यांच्या त्या स्मितहास्यामागे प्रचंड त्याग दिसत होता. हे ते दोन जीव होते ज्यांनी मला मोठं केलं होत. आम्हा भावंडांकरता त्यांनी हाडाची काड केली होती. या हाडांना माझा मृतदेह कसा उचलेल ? या भावनेनं माझे डोळे भरून आले. आईने काहीच विचारलं नाही. पदराने डोळे पुसले. बापाने डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला " तू केस काप रे अर्ध वजन तर त्याचंच असेल"
आपण ३ वर्षापूर्वी भेटलेल्या पोरीने सोडलं म्हणून संपवायला निघालो होतो, ज्यांनी आपल्याला निर्णय घेण्यालायक बनवलं त्याचा आपण विचारच केला नाही. क्षणात सारं काही भानावर आलं. मनोमन मी माझ्या आईवडिलांचे पाय धरले, आणि तिचे ही आभार मानले.
"शेवटी ३ वर्ष खर्च करून मी शहाणपण विकत घेतलं होतं"

No comments:
Post a Comment