एक दिवस सकाळी धुकं बाजूला सारीत फौवदार अंगातील दगडीवर बसला. बापाला त्यांच्या खास शैलीत आवाज देऊन बोलावलं. फौवदार उच्चवर्णी पण त्यात वर्ण भेद नव्हता. घिकेल्या कोणाला तोंडच्या थुकींनी दुखावत नसे.
फौवदारानी या जोडीच्या बळावर कैक हातऱ्या, कणग्या भरल्या. फौवदाराच जून दिस बैलांनी पुन्हा आणलं होत. दिवसांमाग दिवस गेलं बैलांचा जोर आणि फौवदाराची ताकद एकत्र कमी होत होती. जणु एकत्रच म्हातारे होत होते. नदीवर जाताना म्हाताऱ्या सावकाराप्रमाणे सगळे बांध, दऱ्या न्हाहळत जात. आता फौवदार सुद्धा अर्ध्या बिडीत खोकायला लागला होता. इंग्रज - टिक्का जरी वेगळ्या गायीचे बैल असले तरी कधीच एक दाव म्हणा किंवा गाताडी सोडून राहिले नाहीत. जोडी अशी जणू दोन बुबळं. कैक गायिरान चरले, फळवले पण कधी एकमेकांनी टाप टेकली नाही. फौवदाराच्या बैलांपेक्षा महादेवाचं बैल म्हणून म्हाताऱ्या-कोताऱ्या हात लावून आशीर्वाद घेई.
"काय ? फौवदार काय काम काढलत, एवढ्या गारट्यात ?"
फौवदारानी विडी पेटवत म्हणाला "अरं दोन गायी इयाल्या, चार माणसांनी खरोस सोपायचा नाही"
बापानी हातची पुडी घेत विचारलं "काय घातलंय ?"
फौवदार आनंदाने म्हणाला "अर संभा दोनिव खोंड आहेत" चांदे गायीने खोंड घातलाय त्याच्या पण कपाळावर टिक्का आहे.
फौदारानी त्याच्या लहान
पणी इंग्रज बघितले होते. त्याला इंग्रजांची चाकरी करायची होती पण घरच्यांपुढे त्याचं काही एक चाललं नाही! सरते शेवटी दुधाची तहान ताकावर म्हणून गावची फौवजदारी स्वतःकडे घेतली. पण फौवदारानी दुसऱ्या बैलाचं नाव इंग्रज ठेवून त्याला चीपटी खाली घेतलं. कैक दिवस गेले टिक्का आणि इंग्रजची जोडी अख्या पंक्रोशीत प्रसिद्ध झाली. दोन्ही अंडील बैल गावात कुठल्या बैलाचा टिकाव लागू देत नसे. आखीव रेखीव शिंग त्याच्यात डौलदार चाल, गळ्यात गुंगरांचा पट्टा नदीवरून जाता - येताना धुरळा उडवीत आपलीच रंगबाजी करीत ही हुकमी जोडी सगळ्यांच्या नजरा जिंके !
पणी इंग्रज बघितले होते. त्याला इंग्रजांची चाकरी करायची होती पण घरच्यांपुढे त्याचं काही एक चाललं नाही! सरते शेवटी दुधाची तहान ताकावर म्हणून गावची फौवजदारी स्वतःकडे घेतली. पण फौवदारानी दुसऱ्या बैलाचं नाव इंग्रज ठेवून त्याला चीपटी खाली घेतलं. कैक दिवस गेले टिक्का आणि इंग्रजची जोडी अख्या पंक्रोशीत प्रसिद्ध झाली. दोन्ही अंडील बैल गावात कुठल्या बैलाचा टिकाव लागू देत नसे. आखीव रेखीव शिंग त्याच्यात डौलदार चाल, गळ्यात गुंगरांचा पट्टा नदीवरून जाता - येताना धुरळा उडवीत आपलीच रंगबाजी करीत ही हुकमी जोडी सगळ्यांच्या नजरा जिंके !
फौवदारानी या जोडीच्या बळावर कैक हातऱ्या, कणग्या भरल्या. फौवदाराच जून दिस बैलांनी पुन्हा आणलं होत. दिवसांमाग दिवस गेलं बैलांचा जोर आणि फौवदाराची ताकद एकत्र कमी होत होती. जणु एकत्रच म्हातारे होत होते. नदीवर जाताना म्हाताऱ्या सावकाराप्रमाणे सगळे बांध, दऱ्या न्हाहळत जात. आता फौवदार सुद्धा अर्ध्या बिडीत खोकायला लागला होता. इंग्रज - टिक्का जरी वेगळ्या गायीचे बैल असले तरी कधीच एक दाव म्हणा किंवा गाताडी सोडून राहिले नाहीत. जोडी अशी जणू दोन बुबळं. कैक गायिरान चरले, फळवले पण कधी एकमेकांनी टाप टेकली नाही. फौवदाराच्या बैलांपेक्षा महादेवाचं बैल म्हणून म्हाताऱ्या-कोताऱ्या हात लावून आशीर्वाद घेई.
फौवदाराची ताकद हटली. फौवदार आजारी झाला तालुक्या दवाखानात भरती झाला. फौवदार आता काय परतायचा नाही असं कैक गल्ली बोलात विषय चघळा जाई, आणि वाटत पण तस होत. अडा फिरला कि वासे ही फिरतात. मुंबईस राहणारी फौवदाराची पोरं आली आणि वेगळ्याच रंगाचे धूर फौवदाराच्या घरातून उडू लागले. गुरांची अडचण त्यात अग्रणी होती. फौवदाराच्या थोरल्यानी गुरं इकली. म्हाताऱ्या बैलांची जोडी कोण पोसणार म्हणून टिक्का शेजारच्या गावी विकायचं ठरलं. माणसांची बोलणी झाली, सौदा ठरला. ही बातमी वणव्यासारखी पेटली. फौवदाराच्या आजारापरीस बैलांचे दुःखात गाव हिरमुसला होता. सगळेजण आपल्यापरीने बोलत होते.
एप्रिल संपला आणि मे सुरु झाला. गवत सुकल होत आता फक्त कडवय (विषारी वेल) हिरवी राहिली होती टिक्का आणि इंग्रज चरून घराच्या गावंडाला लागले टिक्का पुढे धावत आला आणि इंग्रज पानिवट्यावर पाणी पियाला लागला. झऱ्याच्या बाजूला उगवेलेल गवताच्या डेऱ्या चवीने खायला लागला. या उन्हाच्या दिवसात हिरव गवत म्हणचे आयती मध भेटावी. टिक्का दाव्यावर आल्या आल्या नव्या मालकांनी टिक्काच्या येसणीला कासरा आवळला. आता टिक्का भानावर आला. हा रोजचा गंध नव्हता. त्याच्या नथुन्या फुगल्या आणि बैईल वतोर टाकायला लागला फौवदाराचा पोरगा टिक्काला काठीने मारत होता. बैल वाड्यातून निघायला कबुल नव्हता पण येसणीच्या दुखण्या पुढे त्याची टाकत जवाब देत होती. आता त्याच्या जिवाभावाच्या जिगरयाला जिवाच्या आतंकाने शोधात होता डिरकत. आज त्याला बघायला सगळ गाव होत शिवाय त्याच्या सवंगड्याच्या. त्यात आजी पुटपुटली "हेड्याच्या कासरल्याला गुरु लागलं की मेल्यावर सुटत"
टिक्का इंग्रजांसाठी या घश्याने ओरडत होता, वाड्यातून बाहेर निगताना टिक्काच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. तो सयरा-वयरा त्याचा एक डोळा फौवदाराला आणि दुसरा टिक्काला शोधात होता. सारं गाव टिक्काला हंबरत रडत जाताना क्षितिजापर्यंत पाहत होते. त्यादिवशी गावात अपसुख दुखवटा साजरा होत होता. इंग्रज वाडयाजवळ आलं पण इतकी लोक बघून बैल बावरला त्यांनी एक क्षणात डिरकून टिक्काला आवाज दिला वाड्यातून आवाज येत नव्हता फौवदाराच्या पोरांनी त्याला वाड्यात भरला पण टिक्का नाही हे त्याला समजायला वेळ लागला नाही. दूसऱ्या दारानी शेणकीच्या वरून उडी मारून इंग्रज टिक्का वारेमाप शोधू लागला. आखा गाव डिरकून त्यांनी काढला फौवदाराच्या पोरांच्यानि इंग्रज आर्टनार नव्हता. इंग्रजने सार बाळ एकवटलं आणि सगळं त्राण आणून त्याच्या गंधावर जाऊ लागला. बघता बघता २ किलोमीटरचं अंतर त्याने काही टापांमध्ये पूर केलं. हेड्याचा ट्रक गुरांनी भरला नव्हता म्हणून ट्रक निघाला नाही आणि टिक्काला ट्रक मध्ये बांधून ठेवला होता. इंग्रज पोहचला रात्रभर बैल एकमेकांसाठी डिरकत राहिले. ही खबर फौवदाराच्या कानावर पडली फौवदारनी बळ एकवटल आणि ओले टाके घेऊन पोहचला आणि दोन्ही बैलांना मरणाच्या दारातून आणलं.
पुरा गाव खुश झाला. बैल दाव्यावर आले. पण हा शॉक इतका मोठा होता की शब्दात सांगणं कठीण. या धक्क्यातून टिक्का कधी सावरला नाही १५ दिवसात बैल मेला. भाग्य कुठल्या वाटेने जाईल सांगता येत नाही. आपला सवंगडी गेला या वार्धक्यातून इंग्रजने खाण -पिणं सोडलं आणि मरणाला कवटाळलं. दोघांना एकमेकांच्या शेजारी गाडलं आणि रोपं लावलीत. या धक्कानी फौवदार खचला आणि २ महिन्यात त्यांनी ही आपल्या आवडत्या बैलंसांसोबत अनंताच्या प्रवासाला निघून गेलेत. आज जे तीन आंब्यांची रोपं आहेत ती त्यांच्या अवीट प्रेमाची गोडवी सांगतात.
#बैल #प्राणीप्रेम #गाव