header ads

Tuesday, 21 January 2025

फौवदाराचं बैल

आजी सांगायची जेंव्हा फौवदाराची गुरं वाड्यातून सुटायची तेंव्हा भली मोठी रांग लागायची.गड्यांचा राबता असायचा. काळ सरला आणि फौवदाराच दिवस पण! कैक गुर विकली गेली काही कड्यावरून पडून मेली, कधी काही स्वतः केलं नाही म्हणून वैभव फार टिकलं नाही. फौवदाराकडे आता मोजकीच गुरं उरलीत. 
                           एक दिवस सकाळी धुकं बाजूला सारीत फौवदार अंगातील दगडीवर बसला. बापाला त्यांच्या खास शैलीत आवाज देऊन बोलावलं. फौवदार उच्चवर्णी पण त्यात वर्ण भेद नव्हता. घिकेल्या कोणाला तोंडच्या थुकींनी दुखावत नसे. 
"काय ? फौवदार काय काम काढलत, एवढ्या गारट्यात ?" 
फौवदारानी विडी पेटवत म्हणाला "अरं दोन गायी इयाल्या, चार माणसांनी खरोस सोपायचा नाही"
बापानी हातची पुडी घेत विचारलं "काय घातलंय ?" 
फौवदार आनंदाने म्हणाला "अर संभा दोनिव खोंड आहेत" चांदे गायीने खोंड घातलाय त्याच्या पण कपाळावर टिक्का आहे. 
                           फौदारानी त्याच्या लहान
पणी इंग्रज बघितले होते. त्याला इंग्रजांची चाकरी करायची होती पण घरच्यांपुढे त्याचं काही एक चाललं नाही! सरते शेवटी दुधाची तहान ताकावर म्हणून गावची फौवजदारी स्वतःकडे घेतली. पण फौवदारानी दुसऱ्या बैलाचं नाव इंग्रज ठेवून त्याला चीपटी खाली घेतलं. कैक दिवस गेले टिक्का आणि इंग्रजची जोडी अख्या पंक्रोशीत प्रसिद्ध झाली. दोन्ही अंडील बैल गावात कुठल्या बैलाचा टिकाव लागू देत नसे. आखीव रेखीव शिंग त्याच्यात डौलदार चाल, गळ्यात गुंगरांचा पट्टा नदीवरून जाता - येताना धुरळा उडवीत आपलीच रंगबाजी करीत ही हुकमी जोडी सगळ्यांच्या नजरा जिंके ! 

                         फौवदारानी या जोडीच्या बळावर कैक हातऱ्या, कणग्या भरल्या. फौवदाराच जून दिस बैलांनी पुन्हा आणलं होत. दिवसांमाग दिवस गेलं बैलांचा जोर आणि फौवदाराची ताकद एकत्र कमी होत होती. जणु एकत्रच म्हातारे होत होते. नदीवर जाताना म्हाताऱ्या सावकाराप्रमाणे सगळे बांध, दऱ्या न्हाहळत जात. आता फौवदार सुद्धा अर्ध्या बिडीत खोकायला लागला होता. इंग्रज - टिक्का  जरी वेगळ्या गायीचे बैल असले तरी कधीच एक दाव म्हणा किंवा गाताडी सोडून राहिले नाहीत. जोडी अशी जणू दोन बुबळं. कैक गायिरान चरले, फळवले  पण कधी एकमेकांनी टाप टेकली नाही. फौवदाराच्या बैलांपेक्षा महादेवाचं बैल म्हणून म्हाताऱ्या-कोताऱ्या हात लावून आशीर्वाद घेई. 
                       फौवदाराची ताकद हटली. फौवदार आजारी झाला तालुक्या दवाखानात भरती झाला. फौवदार आता काय परतायचा नाही असं कैक गल्ली बोलात विषय चघळा जाई, आणि वाटत पण तस होत. अडा फिरला कि वासे ही फिरतात. मुंबईस राहणारी फौवदाराची पोरं आली आणि वेगळ्याच रंगाचे धूर फौवदाराच्या घरातून उडू लागले. गुरांची अडचण त्यात अग्रणी होती. फौवदाराच्या थोरल्यानी गुरं इकली. म्हाताऱ्या बैलांची जोडी कोण पोसणार म्हणून टिक्का शेजारच्या गावी विकायचं ठरलं. माणसांची बोलणी झाली, सौदा ठरला. ही बातमी वणव्यासारखी पेटली. फौवदाराच्या आजारापरीस बैलांचे दुःखात गाव हिरमुसला होता. सगळेजण आपल्यापरीने बोलत होते. 
                    एप्रिल संपला आणि मे सुरु झाला. गवत सुकल होत आता फक्त कडवय (विषारी वेल) हिरवी राहिली होती टिक्का आणि इंग्रज चरून घराच्या गावंडाला लागले टिक्का पुढे धावत आला आणि इंग्रज पानिवट्यावर पाणी पियाला लागला. झऱ्याच्या बाजूला उगवेलेल गवताच्या डेऱ्या चवीने खायला लागला. या उन्हाच्या दिवसात हिरव गवत म्हणचे आयती मध भेटावी. टिक्का दाव्यावर आल्या आल्या नव्या मालकांनी टिक्काच्या येसणीला कासरा आवळला. आता टिक्का भानावर आला. हा रोजचा गंध नव्हता. त्याच्या नथुन्या फुगल्या आणि बैईल वतोर टाकायला लागला फौवदाराचा पोरगा टिक्काला काठीने मारत होता. बैल वाड्यातून निघायला कबुल नव्हता पण येसणीच्या दुखण्या पुढे त्याची टाकत जवाब देत होती. आता त्याच्या जिवाभावाच्या जिगरयाला जिवाच्या आतंकाने शोधात होता डिरकत. आज त्याला बघायला सगळ गाव होत शिवाय त्याच्या सवंगड्याच्या. त्यात आजी पुटपुटली "हेड्याच्या कासरल्याला गुरु लागलं की मेल्यावर सुटत" 
टिक्का इंग्रजांसाठी या घश्याने ओरडत होता, वाड्यातून बाहेर निगताना टिक्काच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. तो सयरा-वयरा त्याचा एक डोळा फौवदाराला आणि दुसरा टिक्काला शोधात होता. सारं गाव टिक्काला हंबरत रडत जाताना क्षितिजापर्यंत पाहत होते. त्यादिवशी गावात अपसुख दुखवटा साजरा होत होता. इंग्रज वाडयाजवळ आलं पण इतकी लोक बघून बैल बावरला त्यांनी एक क्षणात डिरकून टिक्काला आवाज दिला वाड्यातून आवाज येत नव्हता फौवदाराच्या पोरांनी त्याला वाड्यात भरला पण टिक्का नाही हे त्याला समजायला वेळ लागला नाही. दूसऱ्या दारानी शेणकीच्या वरून उडी मारून इंग्रज टिक्का वारेमाप शोधू लागला. आखा गाव डिरकून त्यांनी काढला फौवदाराच्या पोरांच्यानि इंग्रज आर्टनार नव्हता. इंग्रजने सार बाळ एकवटलं आणि सगळं त्राण आणून त्याच्या गंधावर जाऊ लागला. बघता बघता २ किलोमीटरचं अंतर त्याने काही टापांमध्ये पूर केलं. हेड्याचा ट्रक गुरांनी भरला नव्हता म्हणून ट्रक निघाला नाही आणि टिक्काला ट्रक मध्ये बांधून ठेवला होता. इंग्रज पोहचला रात्रभर बैल एकमेकांसाठी डिरकत राहिले. ही खबर फौवदाराच्या कानावर  पडली फौवदारनी बळ एकवटल आणि ओले टाके घेऊन पोहचला आणि दोन्ही बैलांना मरणाच्या दारातून आणलं. 
                       पुरा गाव खुश झाला. बैल दाव्यावर आले. पण हा शॉक इतका मोठा होता की शब्दात सांगणं कठीण. या धक्क्यातून टिक्का कधी सावरला नाही १५ दिवसात बैल मेला. भाग्य कुठल्या वाटेने जाईल सांगता येत नाही. आपला सवंगडी गेला या वार्धक्यातून इंग्रजने खाण -पिणं सोडलं आणि मरणाला कवटाळलं. दोघांना एकमेकांच्या शेजारी गाडलं आणि रोपं लावलीत. या धक्कानी फौवदार खचला आणि २ महिन्यात त्यांनी ही आपल्या आवडत्या बैलंसांसोबत अनंताच्या प्रवासाला निघून गेलेत. आज जे तीन आंब्यांची रोपं आहेत ती त्यांच्या अवीट प्रेमाची गोडवी सांगतात. 

                            





    






#बैल #प्राणीप्रेम #गाव  


     

Monday, 13 January 2025

माझी आत्महत्या

माझी आत्महत्या
( हा ब्लॉग किंवा ही कथा काल्पनिक आहे. यात काही साधर्म्य आढळ्यास स्वतःला भाग्यवान समजावे )




तो दिवस तसा काही फार वेगळा नव्हता. 
भांड्यांच्या कळकटानच मला जाग आली होती. खरं  तर ही जाग पूर्णार्थाने आली होती. 
सवई प्रमाणे मी काही गोष्टी केल्या.
पुरुषी अहम दुखावला की, तो कोणताही निर्णय घ्यायला तुम्हाला तो सहज तयार करतो. इथं तर त्याच्यावर बलात्कार झाला होता. 
कसं मरावं ? काय खावं याचा विचार मी चवीसोबतच त्याची मला ऍसिडिटी होणार नाही ना ! इतपत मी करीत होतो. ट्रेन, गळफास, सर्प द्वंश इत्यादींचा मी विचार करीत होतो. हे सारे पर्याय मला जीवघेणे वाटले शेवटी मी झोपेच्या गोळ्या घेण्याचा विचार केला. पण मरण इतकंही स्वस्त नसतं हे मला तेंव्हा कळालं. खुप रिसर्च करून एका ओळखीतल्या म्हाताऱ्या आजींच्या औषधाची चिट्टी मी पळवली. मोठ्या हिकमतीने झोपेच्या गोळ्या जमवल्या आपली प्रतिकार शक्ती राकट आहे म्हणून मी ६ गोळ्या एकत्र केल्या. 
            आता प्रश्न होता आत्महत्याच्या चिट्टीचा ? कोण - कोण आपल्या मरणावर रडेल ही कल्पना मला फार आनंद देत होती. मग आत्महत्याच्या चिट्टीच्या मजकुराचा मी विचार केला. २ तर चक्क मीच हसून लोटपोट झालो इतकी विनोदी मी लिहिल्या होत्या. हे काम मी थोडं बाजूला ठेवलं. आपल्या या ग्रहावरच्या शेवटच्या दिवशी आपण ते सर्व करायचं असं ठरवलं. मी उगीचंच फिरलो अनेकांची माफी मागितली, लोकांना मदत केली, आवडत्या लोकांना वेळ काढून भेटलो, भरपूर खाल्लं, ते ते सर्व केलं जे जे करण्यासाठी मी कधी घाबरलो, लाजलो होतो. 
             आम्ही दोघे २ ते ३ वर्ष एकत्र होतो. प्रत्येक क्षण माझ्या मेंदूवर टाक्याने कोरले होते. ती खूप सुंदर, हुशार, आणि साऱ्यांपेक्षा वेगळी होती. तिच्या वागणुकीचे पदर होते. इतर मुलींप्रमाणे ती नव्हतीच. तिच्या याच वेगळे पणाचा मी घायाळ ठरलो. मी माझं प्रेम तिच्या समोर व्यक्त केलं, तिने एक आठवड्याने सांगितले 'नाही' पण आम्ही एकत्र होतो. बघता - बघता एकमेकांच्या सहवासाची गोडी वाटू लागली. भेटी इतक्या वाढल्या की त्याच्या गाठी पडल्या. बघता बघता दिवस भुर्रर्रर्र झाले. मला संधी मिळाली की माझं प्रेम तिच्यावरचा माझा असणारा जीव मी तिला तन्मयतेते सांगे. समोर असली तर हसायची आणि msg वर कायम गप्प. तेंव्हा कळलं ती ते लाजून नाही तर माझ्यावर हसायची.  खरं तर हे सारं माझ्यासाठी बोचरं असायचं पण... ती वेगळी ना ... ! कधी कधी वाटे चालताना तिने माझा हळूच आपला हात  घ्यावा, एकत्र जेंव्हा असू तेंव्हा जगाच्या तापाला बाजूला करून निवांत विश्रांती माझ्या खांद्यावर घ्यावी असं मला नेहमी वाटे. कधी डोळ्यात गेलेल्या खळ हळुवार फुंकर मारून सुखावण्याचा प्रयत्न करावा असं नेहमी वाटे पण तिने तसं कधी केलं नाही; शेवटी ती वेगळी होती ... म्हणून मग मीच हे सारं काही करत असे. शेवटी तिच्या वेगळेपणाची खाज आणि कौतुक मलाच होतं. कधी तरी तुम्ही जे करत असता त्याचा ही बांध फुटतो. त्याच्याकरता जीव जळावा त्यालाच त्याची फिकीर नसेल तर काय उपयोग ? एके दिवशी मी वेगळं ठरायचं ठरवून विचारलं 
             "माझ्या I Love You चा तू कधी reply का देत नाही ? "

आणि कैक दिवसांपासुनचा हा प्रश्न तिने मार्गी लावायचं ठरवलं. ती म्हणाली
   " तू माझ्यावर प्रेम करतोस its ok! मी कधी तुला म्हणाले का मी ही तुझ्यावर प्रेम करते, आफ्टर ऑल हा तुझा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. " 

माझ्या चांगलाच लक्षात आलं, एका क्षणात ते सारं काही ओझल झालं.. आयुष्य सोबत घालवण्याच्या माझ्या इच्यांना तिने मूठ माती दिली होती. 
  
            " तुला आणखी बोलायचं नसेल, तर आपण निघूया " 

ती ते सारं इतक्या सहज बोलतं होती कि, तिच्या त्या वेगळेपणाचा आता मला राग, किव येत होती. 

            "plz मला घरी जाऊन जेवण करायचं आहे "

बघता बघता आम्ही 'वाटेला' लागलो  
मला माझं उत्तर तर मिळालं होतं पण ते सहन करण्याची ताकद मी हरवून बसलो होतो. तिच्या चेहऱ्यावर अजिबात भाव नव्हते. त्या रात्री भीमराव पांचाळ, सुधीर भट, जगजीत सिंग, या साऱ्यांना मी झोपू दिलं नाही. पंकज उदास तर भलतेच उदास झाले होते. 
            आता हा ग्रह सोडायचा हा विचार मी पक्का केला. बऱ्यापैकी मी एक तारीख निवडली कारण अशी संधी फार कमी जणांना मिळते. ठरल्या दिवशी मी घरीच थांबलो. फिरलो, भटकलो संध्याकाळी चहाची वेळ झाली. आईने चहा पुढ्यात देत अनेक बालपणीचे किस्से सांगायला सुरुवात केली. मी लहान असताना पावसाळी दिवस होते. मी आजारी झालो होतो. आईने मला डॉक्टरकडे घेऊन गेली होती. त्यांच्या इथे आम्हाला वेळ लागला आणि आमची S.T.  सुटली. आई मला घेऊन उन्हाच्या कडाक्यातून १६ किमी चालत घरी आली. माझ्या आजारपणात तिने ऊन वाऱ्याची फिकीरच केली नव्हती. आईने वडिलांनी केलेल्या त्या सर्व त्यागाचा आई खूप मनमोकळ्या स्वभावाने हसत सांगत होती. त्यांच्या त्या स्मितहास्यामागे प्रचंड त्याग दिसत होता. हे ते दोन जीव होते ज्यांनी मला मोठं केलं होत. आम्हा भावंडांकरता त्यांनी हाडाची काड केली होती. या हाडांना माझा मृतदेह कसा उचलेल ? या भावनेनं माझे डोळे भरून आले. आईने काहीच विचारलं नाही. पदराने डोळे पुसले. बापाने डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला " तू केस काप रे अर्ध वजन तर त्याचंच असेल" 
आपण ३ वर्षापूर्वी भेटलेल्या पोरीने सोडलं म्हणून संपवायला निघालो होतो, ज्यांनी आपल्याला निर्णय घेण्यालायक बनवलं त्याचा आपण विचारच केला नाही. क्षणात सारं काही भानावर आलं. मनोमन मी माझ्या आईवडिलांचे पाय धरले, आणि तिचे ही आभार मानले. 

"शेवटी ३ वर्ष खर्च करून मी शहाणपण विकत घेतलं होतं"

Contributors